राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोरील डीपी तत्काळ हटवावी बिघाड होऊन लख्ख प्रकाश पडत असल्याने दुर्घटनेचा धोका : नागरिकांची मागणी

Khozmaster
1 Min Read

 

सिंदखेड राजा (प्रतिनिधी) :
राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर असलेल्या महावितरणच्या डीपीमध्ये वारंवार बिघाड होऊन अचानक लख्ख प्रकाश पडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी दररोज जिजाऊ भक्त व शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच याच परिसरात भाजी मंडीही भरत असल्यामुळे गर्दी वाढत असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा गर्दीच्या ठिकाणी डीपी असणे अत्यंत धोकादायक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. संभाव्य धोका लक्षात घेता ही डीपी सुरक्षित ठिकाणी हलवावी, अशी मागणी नागरिक, जिजाऊ भक्त व शिवभक्तांकडून जोर धरत आहे.

डीपीमुळे परिसरातील नागरिकांना धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने व महावितरणने तत्काळ दखल घेऊन डीपी इतरत्र हलवावी, अशी मागणी जनमानसातून जोरदारपणे केली जात आहे.

0 9 4 8 6 1
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *