मोताळा तालुका क्रीडा संकुलाचा होणार कायापालट तहसीलदार सरिता पाटील यांनी राबविले स्वच्छता अभियान

Khozmaster
2 Min Read

मोताळा, दि. ८ (प्रतिनिधी) :
बुलढाणा-मलकापूर रोडवरील दिवाणी फौजदारी न्यायालयाजवळ भव्य असे तालुका क्रीडा संकूल उभारण्यात आले आहे. येथे दररोज शेकडो मुले-मुली सरावासाठी येतात. मात्र, गेल्या काही काळात क्रीडांगणावर मोठ्या प्रमाणात घाण व दुरावस्था निर्माण झाल्याने मोताळा तहसीलदार सरिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ६ फेब्रुवारी रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मोताळा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून ग्रामीण भागातील शेकडो मुले-मुली पोलीस भरती, सैनिक भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षांच्या शारीरिक सरावासाठी मलकापूर रोडवरील या क्रीडा संकूलात नियमित प्रॅक्टिस करतात. परंतु क्रीडा संकूल परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढल्याने व घाण साचल्याने विद्यार्थ्यांना सराव करताना अडचणी येत होत्या.

ही बाब लक्षात येताच तहसीलदार सरिता पाटील यांनी तातडीने पुढाकार घेत ट्रॅक्टर व रोटावेटरच्या सहाय्याने क्रीडा संकूलाची स्वच्छता करून घेतली. त्यामुळे क्रीडांगण पुन्हा सरावासाठी उपयुक्त झाले आहे.

यावेळी तहसीलदार सरिता पाटील यांनी ‘पुण्यनगरी’शी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील मुला-मुलींना पोलीस भरतीच्या सरावासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पुढील काळात क्रीडा संकुलासाठी वॉल कंपाऊंड उभारण्याचे प्रयत्न केले जातील. तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील.

दरम्यान, मोताळा क्रीडा संकुलात दररोज २०० ते २५० मुले-मुली भरतीचा सराव करतात. येथे स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, लाईट व्यवस्था, ट्रॅकवर लालमाती टाकणे तसेच कायमस्वरूपी चौकीदाराची नेमणूक करण्यात आल्यास हे क्रीडा संकूल ग्रामीण भागातील तरुणांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरेल, असा मनोदय श्री साई अकॅडमीचे संचालक प्रमोद कौसकार यांनी व्यक्त केला.

0 9 4 8 5 6
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *