मलकापूर, दि. ८ (प्रतिनिधी) :
बुलढाणा जिल्ह्यात तरुण मुली व व्यक्ती बेपत्ता होण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून, आता पुन्हा दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत दोन तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कोकलवाडी (ता. नांदुरा) आणि घिर्णी (ता. मलकापूर) येथील १८ ते १९ वर्षीय दोन तरुणी अचानक बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घिर्णी येथून १८ वर्षीय दिपाली भारती बेपत्ता
मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील घिर्णी येथील दिपाली गणेश भारती (वय १८ वर्षे) ही तरुणी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती अद्याप सापडलेली नाही.
या प्रकरणी दिपालीचे वडील गणेश गुणवंत भारती यांनी मलकापूर शहर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे.
दिपालीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे –
-
उंची : ५ फूट
-
रंग : गोरा
-
बांधा : सडपातळ
-
कपडे : पांढऱ्या रंगाचे कपडे
दिपालीबाबत काही माहिती मिळाल्यास मलकापूर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
कोकलवाडी येथील १९ वर्षीय मल्लेश्वरी राजपूत २७ जानेवारीपासून बेपत्ता
दुसरी घटना नांदुरा तालुक्यातील कोकलवाडी येथून समोर आली आहे. येथील मल्लेश्वरी सुभाषसिंह राजपूत (वय १९ वर्षे) ही तरुणी **२७ जानेवारी
Users Today : 28