धाबेकर नगरातील भागवत व कीर्तन महोत्सवाचा समारोप

Khozmaster
2 Min Read

अकोला, दि. ८ (प्रतिनिधी) :
खडकी येथील धाबेकर नगरमधील संत गजानन महाराज मंदिरात संत गजानन महाराज प्रकटदिन महोत्सवानिमित्त आयोजित हभप मंगेश महाराज वराडे यांच्या भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचा रविवारी (८ फेब्रुवारी) भक्तिभावाने समारोप झाला.

समारोपाच्या दिवशी हभप भागवत महाराज देशमुख यांचे कालाकीर्तन झाले. या कीर्तनातून भागवतेचे महत्त्व व उपयुक्तता प्रभावीपणे प्रतिपादित करण्यात आली. समारोप प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या धार्मिक उत्सवाची प्रशंसा केली.

संत गजानन महाराज चॅरीटेबल ट्रस्ट धाबेकर नगरचे अध्यक्ष राजेश घोगरे, सौ. घोगरे तसेच पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी आयोजित महाप्रसादाचा शेकडो भक्तांनी लाभ घेतला.

उत्सवात रात्री “दरबार गजाननांचा” हे संगीतमय संत गजानन महाराज नाट्य मंचन करण्यात आले. या कार्यक्रमाचा परिसरातील भक्तांनी मोठ्या आनंदाने आस्वाद घेतला.

या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी संत गजानन महाराज चॅरीटेबल ट्रस्ट धाबेकर नगर व खडकी बु. येथील पदाधिकारी व नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.


चैतन्य अप्तुरकरची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

अकोला, दि. ८ (प्रतिनिधी) :
क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांच्या वतीने आयोजित विभागीय पॉवर लिफ्टिंग शालेय स्पर्धा मलकापूर (जि. बुलढाणा) येथे २७ जानेवारी रोजी पार पडल्या.

या स्पर्धेत ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय अकोला येथे शिक्षण घेत असलेल्या चैतन्य दिलीप अप्तुरकर याने १०५ किलो वजन गटात अमरावती विभागातून प्रथम क्रमांक पटकावला.

त्याची ३ व ४ फेब्रुवारी रोजी सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 9 4 2 5 4
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *