तेल्हारा, दि. ८ (प्रतिनिधी) :
दुःख, त्याग आणि कष्ट यांचे समर्पित रूप म्हणजे रमाईंचे जीवन होय, असे प्रतिपादन भिमराव परघरमोल यांनी केले.
जळगाव जामोद येथील गौतम नगरमधील बुद्ध विहारात विशाखा महिला मंडळ व तथागत क्रीडा मंडळ यांच्या वतीने रमाई जयंतीनिमित्त भिमराव परघरमोल यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर भाऊराव बांगर, सिद्धार्थ बोदडे, विनोद वानखडे, देविदास तिल्लेराव यांची उपस्थिती होती.
रमाईसह महापुरुषांच्या प्रतिमापूजनानंतर त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी काही शाळकरी विद्यार्थिनींनी भाषणे केली.
व्याख्यानात भिमराव परघरमोल म्हणाले की, अनेक महिलांनी आपल्या आयुष्यात दुःख सहन करत माणसे व चार-चार मुलांना मूठमाती दिली, मात्र बाबासाहेबांना घडवण्यासाठी रमाई यांनी सर्वस्वाचा त्याग करून अपरिमित कष्ट उपसले. आदर्श संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या महिलांनी रमाईंचा आदर्श घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. प्रेरणा वानखडे व कु. मेघा तायडे या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी केले.
Users Today : 11