कृषी पर्यवेक्षकास लाच घेताना रंगेहात पकडले एसीबीची पिंपळगाव देवी फाट्यावर कारवाई : चार हजारांची लाच स्वीकारताना अटक

Khozmaster
1 Min Read

मलकापूर, दि. ९ (प्रतिनिधी) :
तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ही कारवाई ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास मलकापूर–बोदवड मार्गावरील पिंपळगाव देवी फाट्यावर करण्यात आली.

एका शेतकऱ्याने कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या पूर्वसंमतीने मळणीयंत्र (थ्रेशर) खरेदी केले होते. संबंधित यंत्राच्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी मोबदला म्हणून कृषी पर्यवेक्षक ईश्वर सावकारे याने शेतकऱ्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाच देण्यास शेतकरी तयार नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार ६ फेब्रुवारी रोजी पडताळणी कार्यवाही करण्यात आली. या दरम्यान तडजोडीअंती आरोपीने चार हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविली.

त्यानंतर एसीबीने ९ फेब्रुवारी रोजी पिंपळगाव देवी फाटा परिसरात, राधास्वामी सत्संगाजवळ सापळा रचला. पंचांसमक्ष आरोपी ईश्वर सावकारे याने चार हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्यास रंगेहात पकडून अटक केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विलास गुसिंगे, लक्ष्मीकांत इंगळे, गजानन गाल्डे, रणजित व्यवहारे, शैलेश सोनवणे, नितीश शेटे आदींच्या पथकाने केली.

या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

0 9 4 0 1 9
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *