डोणगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :
येथील प्रसिद्ध व्याख्याते तथा साहित्यिक प्रा. वसंत गिरी यांचा मुलगा प्रज्वल गिरी याचा लोणावळा येथे दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मेहकर परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रज्वल वसंत गिरी हा पुणे येथे बी.एड.चे शिक्षण घेत होता. तसेच तो एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. ८ फेब्रुवारी रोजी प्रज्वल हा नातेवाइकांसोबत कारने मुंबईहून पुण्याकडे येत होता. प्रवासादरम्यान लोणावळा येथे अल्पोपहारासाठी सर्वजण थांबले.
यावेळी प्रज्वल व त्याचा मावसभाऊ “आम्ही टेकडीवरून फिरून येतो” असे सांगून जवळील टेकडीकडे गेले. मात्र तेथे फिरताना अचानक पाय घसरल्याने प्रज्वल खोल दरीत कोसळला. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रज्वलचे वडील प्रा. वसंत गिरी हे मेहकर येथील एम.ई.एस.ओ. महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या एकपात्री प्रयोगाचे राज्यभर पाचशेपेक्षा अधिक प्रयोग सादर केले आहेत. तसेच क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगांचेही त्यांनी हजाराहून अधिक सादरीकरण केले आहे. त्यांची पाच पुस्तके प्रसिद्ध आहेत.
एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने गिरी कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच गिरी कुटुंबीय रात्रीच पुण्याकडे रवाना झाले.
प्रज्वल गिरी यांच्या पार्थिवावर मेहकर येथे उद्या १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आ
Users Today : 17