आरोपी ग्रामसेवक व शिपायाने फिर्यादीस भरपाई द्यावी पिंपरी माळी येथील हल्ला प्रकरण : जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश प्रत्येकी ७५०० रुपये नुकसानभरपाई व एक वर्ष चांगल्या वर्तनाचा बॉण्ड

Khozmaster
2 Min Read

डोणगाव, दि. ९ (प्रतिनिधी) :
पिंपरी माळी येथील राजीव महादेव इंगळे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती न दिल्याने संतप्त झालेल्या ग्रामसेवक व शिपायाने त्यांना मारहाण केल्याप्रकरणी मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींनी फिर्यादीस प्रत्येकी ७५०० रुपये नुकसानभरपाई देण्याचा तसेच एक वर्ष चांगले वर्तन ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय ९ फेब्रुवारी २०२६ रोजी देण्यात आला.

याबाबत फिर्यादी राजीव इंगळे यांनी ३० डिसेंबर २०१७ रोजी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार ग्रामपंचायत पिंपरी माळी येथे सिमेंट रस्ता व घरकुल बांधकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय असल्याने त्यांनी माहिती अधिकारात ग्रामपंचायतीकडे माहिती मागितली होती.

माहितीबाबत विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेले असता ग्रामसेवक भगवान काळे व शिपाई संतोष गोपाळा इंगळे यांनी लाठ्याकाठ्या तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला होता.

या प्रकरणी मेहकर पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल करून प्रकरण मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयात चालविण्यात आले. विशेष म्हणजे तब्बल तेरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला.

या प्रकरणात सरकारी वकील संतोष मूलचंद खात्री यांनी युक्तिवाद केला. कलम ३२३ नुसार गुन्हा सिद्ध झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र तांबे यांनी आरोपी भगवान काळे व संतोष गोपाळा इंगळे यांना प्रत्येकी ७५०० रुपये नुकसानभरपाई फिर्यादीस देण्याचा आदेश दिला. तसेच एक वर्ष चांगले वर्तन ठेवण्याचा बॉण्डही न्यायालयाने लिहून घेतला.

0 9 3 7 5 9
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *