देऊळगाव राजा, दि. ९ (प्रतिनिधी) :
शहरातील प्रतापनगर परिसरात राहणारी सानियाबी हनीफ सैयद (वय १९ वर्षे) ही तरुणी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजतापासून बेपत्ता झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रतापनगर भागातील रहिवासी फर्जानाबी सैयद हनीफ यांची मुलगी सानियाबी हनीफ सैयद ही ५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास गावातून सामान आणण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. मात्र, बराच वेळ लोटूनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती मिळून आली नाही.
त्यानंतर तिच्या वडिलांनी ८ फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी मिसिंगची नोंद केली आहे.
सानियाबीची ओळख
-
रंग : गोरा
-
उंची : ५.५ फूट
-
बांधा : मजबूत
-
वेशभूषा : काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार मुसा व गजानन काकड करीत आहेत.
Users Today : 6