स्नेहसंमेलनामुळे मुलांच्या सुप्त गुणांना चालना : पळसकर

Khozmaster
1 Min Read

डोणगाव :
स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मुलांच्या सुप्त गुणांना चालना मिळते तसेच त्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळते, असे मत माजी सभापती राजेंद्र पळसकर यांनी व्यक्त केले.

स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती राजेंद्र पळसकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शैलेश सावजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका वर्षा लांभाडे यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर करत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शालेय उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर, धार्मिक तसेच जनप्रबोधनात्मक गीते सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे संचालन राहुल डोंगरदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाला प्रसाद आखाडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका वर्षाताई लांभाडे, शिक्षिका सुनीता भुसारी, संगीता काळे, मालती अंभोरे, छाया बोरुडे, लता जामकर, वैशाली चव्हाण तसेच सहायक शिक्षक राहुल डोंगरदिवे, पवन गायकवाड आदींनी परिश्रम घेतले

0 9 4 8 5 4
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *