साखरखेर्डा, दि. १२ (प्रतिनिधी) :
येथील गोविंद रामानंद समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज रामदासी संस्थानमध्ये दि. ११ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान दासनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या आठ दिवसांच्या महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी ५:३० वाजता श्रींची काकडा आरती, ७:३० वाजता अभिषेक सोहळा, सकाळी १०:३० वाजता नैवद्य आरती सेवा, सायंकाळी ५:३० वाजता उपासना सेवा, ७ वाजता पालखी सेवा, तसेच रात्री भजन व गायन सेवा आयोजित करण्यात आली आहे.
११ फेब्रुवारी रोजी दासनवमी महोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी पंकज किंबहुले यांचे प्रवचन, संदीप बुवा मांडके यांचे कीर्तन, तसेच रात्री भूषण महाजन यांची गायन सेवा झाली.
१२ फेब्रुवारी रोजी दशमी निमित्ताने वसु भारद्वाज यांचे प्रवचन, संदीप बुवा मांडके यांचे कीर्तन आणि रात्री घननीळ पाटील यांची गायन सेवा होणार आहे.
१३ फेब्रुवारी रोजी एकादशी निमित्ताने वसु भारद्वाज यांचे प्रवचन, व्यास पुणे यांचे कीर्तन, रात्री आत्माराम दुतोंडे यांचे गायन होणार आहे.
१४ फेब्रुवारी रोजी सकाळी रामदास पंत आचार्य यांचे प्रवचन, अंबिकाताई लिंबेकर यांचे कीर्तन आणि रात्री श्रीपाद निंबेकर यांची गायन सेवा होईल.
१५ फेब्रुवारी रोजी शिवरात्री निमित्ताने मुकुंद मुळे यांचे प्रवचन, प्रणव बुवा जोशी यांचे कीर्तन आणि रात्री कृष्णेंद्र वाडीकर यांचे गायन होणार आहे.
१६ फेब्रुवारी रोजी पुन्हा मुकुंद मुळे यांचे प्रवचन, प्रणव बुवा जोशी यांचे कीर्तन आणि रात्री नागेश अडगावकर यांची गायन सेवा होईल.
१७ फेब्रुवारी रोजी प. पू. प्रल्हाद महाराज रामदासी यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त रामदास पंत आचार्य यांचे प्रवचन होईल. यानंतर दुपारी १२ वाजता गुलाल व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
१८ फेब्रुवारी रोजी सकाळी रथोत्सव मिरवणूक काढण्यात येणार असून, त्यानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता होणार आहे.
Users Today : 26