मलकापूर :
तालुक्यातील नरवेल मंडळातील मौजे दसरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमास तहसीलदार समाधान सोनवणे, नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, निरीक्षण अधिकारी धनश्री हरणे, तालुका कृषी अधिकारी सूर्यवंशी, पशुधन विकास अधिकारी चेतन शेंबेकर, मंडळ अधिकारी शशिकांत वानखडे, कुलवंतसिंग राजपूत, तलाठी राहुल खर्चे, पर्यवेक्षक सुपे, ग्रामसेवक निंबोळे, कृउबास संचालक विजय साठे, श्रावण पाटील तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये विविध विभागांच्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच महसूल विभाग व इतर विभागांचे विविध दाखले वितरण करण्यात आले. यावेळी दसरखेड येथील शेतकरी पंढरी डोसे यांना कृषी विभागाकडून मंजूर झालेल्या ट्रॅक्टरची चावी तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
Users Today : 15