नांदुऱ्याजवळ जेसीबीने दुचाकीला उडवले मलकापूरचे निवृत्त कर्मचारी गंभीर

Khozmaster
1 Min Read

नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल

नांदुरा, दि. १२ (प्रतिनिधी) :
मलकापूर-नांदुरा मार्गावर वडनेर भालजी नजीक असलेल्या ठाकूर पेट्रोल पंपाजवळ जेसीबीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार शेषराव नामदेवराव सोनुने (वय ६८) रा. बन्सीलाल नगर, मलकापूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अकोला येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नांदुरा पोलिसांत जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलकापूर शहरातील बन्सीलालनगर येथे राहणारे शेषराव सोनुने हे त्यांची मोटारसायकल क्रमांक एमएच-२८-बीएच-२५४५ ने मलकापूर येथून लांजुळकडे जात होते. प्रवासादरम्यान वडनेर भालजी शिवारातील ठाकूर पेट्रोल पंपाजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या जेसीबी (एमपी-०९-जीएफ-४९७२) च्या चालकाने वाहन अत्यंत भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवत सोनुने यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत सोनुने यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून तसेच डाव्या पायाच्या गुडघ्याला व घोट्याला फ्रॅक्चर झाले आहे.

अपघातानंतर नागरिकांनी त्यांना रुग्णवाहिकेतून मलकापूर येथील आस्था रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलविले. सध्या त्यांच्यावर डॉ. सोनुने हॉस्पिटल (अकोला) येथे उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी सोनुने यांच्या जबाबावरून नांदुरा पोलिसांनी जेसीबी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २८१, १२५ (ब), ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रमोद चिखलकर करीत आहेत.

0 9 3 0 5 5
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *