खामगाव, दि. १२ (प्रतिनिधी) :
जवळील शिर्ला नेमाने येथे जयराम महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. येत्या १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प मंडळाने केला असून, त्यामध्ये रक्तदान शिबिर, प्रबोधनपर कीर्तन, महाप्रसाद व शोभायात्रेचा समावेश आहे.
बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या शिबिराच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी वैद्यकीय अधिकारी प्रणाली देशमुख, डॉ. जीवन राठोड, राजश्री पाटील, राम अंभोरे, विष्णू कदम, अशोक तायडे, संदीप राठोड आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर अशोक तायडे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरात डॉ. जीवन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आशा सेविका जया खंडेराव, हेमराज चव्हाण, जीवन चव्हाण, प्रशांत चव्हाण, जयेश चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण, लक्ष्मण राठोड, कल्पेश राठोड, ओम राठोड, अभिषेक जाधव, अभिषेक पाचपोर, वैभव धुरंधर, संदीप राठोड, दीपक बंड आदी एकूण १५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी जयराम महाराज सांस्कृतिक क्रीडा मंडळातील युवक वर्गासह भारती काळे, मो. आतेहशाम मो. अन्सार, मेघा वालयरे, कैलास राऊत, प्रियंका परिहार, आशिष भिवसाने, राजेश तायडे, अर्चना चव्हाण, देवकन्या खंडेराव, नूतन घोरपडे, प्रशांत पांढरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Users Today : 4