बोरी अडगाव येथून विवाहित महिला बेपत्ता खामगाव ग्रामीण पोलिसांत मिसिंगची नोंद

Khozmaster
1 Min Read

खामगाव (प्रतिनिधी)
तालुक्यातील बोरी अडगाव येथील २८ वर्षीय विवाहित महिला घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना उघडकीस आली असून ती अद्याप परत न आल्याने खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कायमस्वरूपी मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारत बालुजी सुरवाडे (रा. बोरी अडगाव, ता. खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी प्रियंका संदीप अंभोरे (वय २८) ही दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली.

बराच वेळ उलटूनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद लागत होता. त्यानंतर कुटुंबीयांनी गावात तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, मात्र तिचा कुठेही मागोवा लागला नाही.

या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मिसिंगची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. संबंधित महिलेबाबत कुणाला माहिती मिळाल्यास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

0 9 3 0 5 4
Users Today : 3
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *