सुसज्ज अभ्यासिकेला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर नगरपालिकेच्या सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; बहुजन उद्धारक सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश

Khozmaster
1 Min Read

मलकापूर, दि. १३ (प्रतिनिधी)

नगर परिषदेच्या अखत्यारीतील चाळीसबिघा परिसरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या सुसज्ज अभ्यासिका इमारतीला ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचे नाव देण्याचा प्रस्ताव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत हा ठराव एकमताने संमत करण्यात आला.

या नामकरणासाठी बहुजन उद्धारक सेवा समितीच्या वतीने मागील तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या संदर्भात ११ एप्रिल २०२४ रोजी तत्कालीन नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे तसेच तहसीलदार तथा नगर परिषद प्रशासक राहुल तायडे यांना निवेदन देण्यात आले होते. याशिवाय मंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही निवेदन सादर करण्यात आले होते.

दरम्यान, नगर परिषदेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासकीय स्तरावर याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र, डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांच्याकडे पुन्हा मागणी करण्यात आली. यावेळी हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडून मंजूर केला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली होती.

0 9 3 0 7 9
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *