बुलढाणा:
मोताळा तालुक्यातील वाढत्या अनधिकृत सावकारीला पायबंद घालण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जी.जे.आमले यांनी मोठा निर्णय फरदापुर येथील एका सावकारग्रस्त प्रकरणात दिला आहे. ज्यामुळे पिडीत शेतकऱ्याला खरेदी करून दिलेली शेती परत मिळाली आहे. तर सहा महिन्यांपूर्वीही मोताळा तालुक्यातील कोथळी येथील अनधिकृत सावकारांच्या मुस्क्या आवळून अनधिकृत सावकारीला मोठा हादरा कर्तव्यदक्ष अधिकारी आमलेंनी दिला होता. तर या कारवाईमुळे आता अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहे. सदर महत्त्वपूर्ण निकालामुळे सावकारग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अँड.सतीशचंद्र रोठेंवर विविध स्तरांमधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मोताळा तालुक्या अंतर्गत येणाऱ्या फर्दापूर येथील शेतकरी कमलाकर सुधाकर व्यवहारे यांची गट नंबर 55 एकूण क्षेत्रफळ पाच हेक्टर 97 आर जमीन सावकारी पाशातून राजू पुनाजी जाधव यांनी दस्त क्रमांक 3370/2023 खरेदी खताद्वारे नावावर करून घेतली होती. या अनुषंगाने 27/04/2024 रोजी अँड.सतीशचंद्र रोठेंनी पिडित शेतक-याच्या वतीने कायदेशीर प्रकरण सहाय्यक निबंधक यांच्या न्यायालयात सादर केले. प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने वस्तुनिष्ठ पुरावे आणि कायदेशीर केलेला युक्तिवाद सदर प्रकरणात शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. त्यामुळे सदर प्रकरण आता जा.क्र.सनिमो/सावकारी/कलम 16/47/2026 नुसार कारवाई करण्यासाठी सावकारांचे निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
Users Today : 9