जगन्नाथ पुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा

KHOZ MASTER
2 Min Read

 

सिंदखेडराजातून राष्ट्रीय गौरव यात्रेचे प्रस्थान

 

अखंड हिंदुस्तानचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विलास पांगरकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून मागील १७ वर्षांपासून देशातील विविध राज्यांत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी हा सोहळा ओडिशातील पवित्र स्थळ जगन्नाथ पुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

नाशिक येथून राष्ट्रीय गौरव यात्रेचे प्रस्थान झाले असून १५ फेब्रुवारी २०२६ रोजी यात्रेचे आगमन सिंदखेडराजा येथे झाले. येथे जाधव परिवारातील शिवाजीराजे जाधव व अन्य मान्यवरांनी यात्रेचे जंगी स्वागत केले. राजमाता जिजाबाई यांच्या जन्मभूमीत आशीर्वाद घेऊन हा ताफा जगन्नाथ पुरीकडे रवाना झाला.

 

मागील सतरा वर्षांपासून भारतातील अनेक राज्यांत “जाणता राजा” छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. यावर्षी जगन्नाथ पुरी येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त सज्ज झाले असून यात्रेचा ताफा उत्साहात पुढे जात आहे.

 

या प्रसंगी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रीय गौरव यात्रेचे स्वागत केले. आमदार मनोज कायंदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, ज्योतीताई जाधव, शारदा बावने, अॅड. संदीप मेहेत्रे, सतीश काळे, जगनमामा सहाने, अजीम शेख, राजेंद्र अंभोरे, सिद्धार्थ जाधव, वैभव मीनासे, साजेद काझी, महेश पवार, मसाजी वाघ, विलास देवरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी, भाजप, शरद पवार राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, छावा, मराठा सेवा संघ तसेच डॉक्टर, वकील, अभियंते, पत्रकार व शिवप्रेमी नागरिक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वातावरण शिवमय झाले होते. जगन्नाथ पुरी येथे होणाऱ्या जन्मोत्सव सोहळ्याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *