चिखली प्रतिनिधी :
विदर्भातील घराघरात शिक्षणाची गंगा पोहोचवून सामान्यांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणारे पंजाबराव देशमुख (उपाख्य भाऊसाहेब देशमुख) यांच्या प्रेरणेने २० फेब्रुवारी २०२६ रोजी चिखली येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात शेतकरी प्रबोधन कार्यशाळा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन; आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
कार्यशाळेत शेतकरी बांधवांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील तज्ज्ञ शास्त्रज्ञांकडून विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत पीक व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादनवाढीचे उपाय, मृदासंवर्धन, जलव्यवस्थापन आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
यासोबतच आधुनिक शेती साहित्य, कृषी अवजारे, बियाणे, खत व्यवस्थापन व शेतीपूरक उद्योग यांची माहिती देणारे कृषी प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक शेतकरी व उद्योजकांना प्रदर्शनात स्टॉल लावण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भाऊसाहेब देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे यांनी केले आहे.
चिखलीत २० फेब्रुवारीला शेतकरी प्रबोधन कार्यशाळा व कृषी प्रदर्शन
0
9
4
8
4
0
Users Today : 12
Leave a comment