बुलढाणा प्रतिनिधी :
रायपूर पोलीस स्टेशन हद्दीतील ढासाळवाडी (ता. जि. बुलढाणा) येथून ३२ वर्षीय विवाहित महिला रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रायपूर पोलीस स्टेशन येथे मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
ढासाळवाडी येथील नितीन वसंतराव शेवाळे (वय ३९) हे ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता नेहमीप्रमाणे बुलढाणा येथील गट्टू फॅक्टरीमध्ये कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी अश्विनी नितीन शेवाळे आणि मुलगा घरी होते. संध्याकाळी सुमारे ६.३० वाजता कामावरून परतल्यानंतर घराला कुलूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मुलाने दिलेल्या माहितीनुसार, तो सकाळी ९.३० वाजता शाळेत जाताना आई घरी होती. मात्र दुपारी २.३० वाजता शाळेतून परतल्यावर आई घरात नव्हती आणि घराला कुलूप होते. यानंतर नितीन शेवाळे यांनी आजूबाजूला तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली; मात्र सहा दिवस उलटूनही अश्विनी यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
ओळखपर माहिती:
उंची : अंदाजे ५ फूट ३ इंच
बांधा : सडपातळ
चेहरा : लांबट
रंग : निमगोरा
पेहराव : साडी व त्यावर आकाशी रंगाचे स्वेटर
वरील वर्णनाशी मिळतीजुळती महिला कुठे आढळल्यास तात्काळ रायपूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ढासाळवाडीतून ३२ वर्षीय महिला बेपत्ता; रायपूर पोलिसांत मिसिंग दाखल
0
9
4
8
4
0
Users Today : 12
Leave a comment