जनसंवाद कार्यालयात संत सेवालाल महाराजांना अभिवादन

Khozmaster
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी :
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयात थोर समतावादी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी आ. सिद्धार्थ खरात, मेहकरचे नगराध्यक्ष किशोर गारोळे व शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात नगरसेवक महेश रिंढे, नगरसेवक नितीन तुपे, नगरसेवक प्रा. सतीश ताजने, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष निसार अन्सारी, संदीप गारोळे, दत्ता घनवट, गणेश गावंडे, युवा सेना शहर अधिकारी ऋषिकेश जगताप, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ बाहेकर, अशोक तुपकर, पत्रकार ज्ञानदेव मानवतकर, इंजि. दिनकर शिंदे, सुनील अंभोरे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख आरती देशमुख यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत सेवालाल महाराजांनी समता, बंधुता आणि समाजजागृतीचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्यात पुढे जाण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

0 9 4 8 4 0
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *