पातूर प्रतिनिधी :
श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय येथे नुकतेच नामांकित बसंत अॅग्रो टेक (इंडिया) लिमिटेड यांच्या वतीने भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात महाविद्यालयातील कृषी पदवीधर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध टप्प्यांतून झालेल्या निवड प्रक्रियेनंतर अनेक विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड करण्यात आली.
कॅम्पस इंटरव्ह्यूची सुरुवात कंपनीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या पीपीटी सादरीकरणाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ऋषिकेश शेंडे यांनी केले. त्यांनी कंपनीचे कार्यक्षेत्र, भविष्यातील संधी आणि करिअरच्या विविध वाटा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यानंतर लेखी परीक्षा, गटचर्चा, वैयक्तिक मुलाखत आणि मान्यवरांचे मार्गदर्शन या प्रक्रियेद्वारे अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ माजी कार्यकारी परिषदेच्या सदस्या श्रीमती हेमलता ताई अंधारे यांनी विद्यार्थ्यांनी कॅम्पस ड्राइव्हमध्ये सहभाग घेऊन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे, प्रा. रोहित कनोजे तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थेट नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कंपनीच्या निवड समितीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानाचे आणि आत्मविश्वासाचे विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
कृषी क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेता, पदवी पूर्ण होण्यापूर्वीच नामांकित कंपनीत नोकरीची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक, कर्मचारी व व्यवस्थापनाने अभिनंदन केले.
Users Today : 12