रिअल इस्टेट सल्लागार एजंट वेल्फेअर युनियनचा प्रारंभ

Khozmaster
1 Min Read

अकोला प्रतिनिधी :

रिअल इस्टेट सल्लागार एजंट वेल्फेअर युनियनच्या वतीने रिअल इस्टेट कायद्यांविषयी जनजागृती संवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमादरम्यान युनियनची अकोला महानगर शाखा अधिकृतपणे सुरू करण्यात आली.
स्थानिक शेतकरी भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अनुप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शारदा खेडकर, सुनील इन्नानी, राजवीरसिंग, अतिष तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.
खा. धोत्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात रिअल इस्टेट क्षेत्राच्या वाढत्या व्याप्तीवर प्रकाश टाकला. संघटनेच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच प्रलंबित समस्या सोडवता येतील, असे त्यांनी नमूद केले. महापौर शारदा खेडकर यांनीही शहराच्या विकासात रिअल इस्टेट क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.
सुनील इन्नानी यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातील बदलते कायदे आणि त्यामध्ये युनियनची उपयुक्तता स्पष्ट केली. राजवीरसिंग यांनी युनियनचे उद्दिष्ट, कामकाज आणि भविष्यातील योजना याविषयी माहिती देत रिअल इस्टेट ब्रोकरांनी संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
कार्यकारिणीची घोषणा
कार्यक्रमात युनियनच्या अकोला शाखेच्या कार्यकारिणीची ओळख करून देण्यात आली. यात अतिष तायडे, निलेश देशपांडे, अजय गवळी, श्याम डोंगरे, विठ्ठल चिंतामणे, प्रमोद घोरड, वीरेश ढोके, आशिष देवकते, पवन वानखडे, अजय आवंडेकर, शिवाजी गावंडे आणि वासुदेव पावशे यांचा समावेश आहे.
या संवाद कार्यक्रमामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील कायदे, अडचणी आणि उपाययोजना याबाबत जागरूकता निर्माण होऊन संघटनात्मक बळकटी मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

0 9 4 8 4 0
Users Today : 12
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *