बुलडाणा प्रतिनिधी :
राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, वंचित घटक आणि सामान्य नागरिकांना सातत्याने आर्थिक पाठबळ देत लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपला आहे, असे प्रतिपादन अंबादास दानवे यांनी केले.
वाळूज (बजाजनगर), छत्रपती संभाजीनगर येथील शाखा स्थलांतर उद्घाटन सोहळा १६ फेब्रुवारी रोजी जागृत हनुमान मंदिरासमोर उत्साहात पार पडला. उद्घाटक म्हणून बोलताना दानवे यांनी सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, गारखेडा शाखेचा शुभारंभ दहा वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते झाला होता. वाळूज शाखेचा एकूण व्यवसाय ११ कोटी रुपये असून, त्यापैकी ५ कोटी रुपये सोनेतारण कर्जाचे आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक सेवा देत सुरक्षित कर्ज वाटपाची भूमिका संस्था सातत्याने घेत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या निमित्ताने आरोग्य चिकित्सा व रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, संचालिका सुरेखाताई तायडे, दत्तात्रय काटे (उद्योजक अभियंता व अर्थ अभ्यासक), मेजर अरुण सुरासे (इन्फिनिटी अकॅडमी), काठोळे (माजी क्षेत्र व्यवस्थापक, एमआयडीसी), ललिता सोनवणे (जिल्हा परिषद सदस्य), विष्णू पाटील जाधव (शिवसेना तालुका प्रमुख) तसेच स्थानिक संचालक, खातेदार, ठेवीदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विभागीय व्यवस्थापक गोविंद येवले यांनी केले.
Users Today : 9