कारंजा प्रतिनिधी :
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुजनांचा सन्मान स्थानिक बाबासाहेब धाबेकर सभागृहात १४ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. बन्सल क्लासेसच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात “विद्याव्रती मी व्रत हे माझे…” या गुरुवंदना उक्तीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य मधुकरराव गावंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून किरण पाटील चौधरी, प्रा. सुधीर लुंगे, अभियंता सुनिल कदम, गोपाल पाटील येवतकर तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रविण कानकिरड उपस्थित होते.
यावेळी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुरुजनांना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान अनमोल असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
तसेच पार्थ प्रशांत कराळे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने National Science Olympiad (एनएसओ) परीक्षेत सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल त्याचा विशेष गौरव करण्यात आला. त्याच्या यशाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सन्मान सोहळ्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
Users Today : 9