अकोल्यात शिव-गौरा विवाह महोत्सवाचा भक्तीभावात समारोप

KHOZ MASTER
1 Min Read

अकोला प्रतिनिधी :

शिव-गौरा विवाह महोत्सव समितीच्या वतीने स्थानिक रिझर्व्ह माता मंदिर परिसरात १० ते १६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित शिव-गौरा विवाह महोत्सवाचा सोमवारी मोठ्या भक्तीभावात समारोप करण्यात आला.
समारोप प्रसंगी आयोजित भव्य महाप्रसादाचा शेकडो महिला-पुरुष भक्तांनी लाभ घेतला. समितीने प्रांगणात महाप्रसादासाठी विशेष व्यवस्था केली होती. मध्यरात्रीपर्यंत पर्वत प्रांगणात महाप्रसाद वितरण सेवा सुरू होती.
दरम्यान, विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. वैदिक मंत्रोच्चारात मंगलाष्टके म्हणण्यात आली. भगवान शिव आणि माता गौरा यांची विहंगम झांकी साकारण्यात आली होती. या अनोख्या विवाह सोहळ्याला हजारो भक्तांनी उपस्थिती लावून परिसरात गर्दी केली होती.
उत्सवाच्या निमित्ताने समितीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. विशेष म्हणजे मातृशक्तीने उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवत आयोजन यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.
समितीच्या वतीने उपस्थित भाविकांचे आभार मानून उत्सवाची सांगता करण्यात आली. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिव-गौरा विवाह महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सेवाधारकांनी अथक परिश्रम घेतले.

0 9 3 2 3 4
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *