परीक्षा केंद्र बदल प्रकरण; पत्रकाराला जीवे मारण्याच्या धमक्या, पत्रकार संघटनांचा निषेध

KHOZ MASTER
1 Min Read

चांदूरबाजार प्रतिनिधी :

तालुक्यातील परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलल्याबाबत वृत्त प्रकाशित केल्यामुळे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चे केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख सागर सवळे यांना काही विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा विविध पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे.
माहितीनुसार, शिरजगाव बंड येथे केवळ दोन किलोमीटर अंतरावर परीक्षा केंद्र असताना ऐनवेळी विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटवरील नाव खोडून १६ किलोमीटर दूर अडगाव येथे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम व नाराजी निर्माण झाली होती.
या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सागर सवळे यांना धमक्या मिळाल्याचा आरोप आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेत सवळे यांनी चांदूरबाजार पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने व प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी या घटनेचा निषेध नोंदवित मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना निवेदन पाठविले आहे. पत्रकारांच्या सुरक्षेची हमी देत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून पत्रकार संघटनांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी केली

0 9 3 2 3 4
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *