खामगाव प्रतिनिधी :
ढोरपगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचे वेश परिधान करून गावातून ढोल-ताशा व लेझीमच्या तालावर मिरवणूक काढली. शिवाजी महाराज चौकात मानवंदना देऊन आरती करण्यात आली.
शाळेत प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर प्रभावी भाषणे सादर केली. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
जिल्हा परिषद शाळा, ढोरपगाव (ता. खामगाव)
0
9
4
8
3
8
Users Today : 10
Leave a comment