वर्दडी बुद्रूक येथे छत्रपती प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

वर्दडी बुद्रूक प्रतिनिधी :
येथील छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले.
मशाल यात्रेत उत्स्फूर्त सहभाग
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला १८ फेब्रुवारी रोजी सिंदखेड राजा येथील मातृतीर्थ (राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ) येथे आयोजित भव्य मशाल यात्रेत गावातील अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला.
दुग्धाभिषेक व जन्मोत्सव
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले. तसेच ‘जन्माचा पाळणा’ साजरा करत महाराजांचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
नगरप्रदक्षिणा व शोभायात्रा
दुपारी दोन वाजता आकर्षक सजवलेल्या रथातून महाराजांच्या पुतळ्याची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून झेंडे-पताका खांद्यावर घेऊन ढोल पथक व मुलींचे लेझीम पथक सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या जयघोषात वारकरी संप्रदायाची शोभायात्राही काढण्यात आली.
यामध्ये गायनाचार्य हभप ब्रम्हा महाराज येवले, अनिल महाराज जाधव, दिनकर महाराज साळवे, तबला साथ विष्णू महाराज घोलमे व बँजो वादक प्रभू डोके यांनी सहभाग घेतला.
सर्वधर्मसमभावाचे दर्शन
नगरप्रदक्षिणा मार्गावर महिलांनी घरासमोर सडामार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या. मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या मावळ्यांना शरबत वितरण करून सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालून दिला.
कार्यक्रमात सहभागी सर्वांना फेटे, टोप्या व महाप्रसादाचे वितरण छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या वतीने करण्यात आले.
एकूणच वर्दडी बुद्रूक येथे शिवजयंती उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरी झाली

0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *