मलकापूर तालुका प्रतिनिधी :
दसरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१२५ रुग्णांची तपासणी
शिबिरात परिसरातील सुमारे १२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. रक्तदाब (बीपी) व रक्तातील साखर (शुगर) तपासणी करून आवश्यक औषधे मोफत देण्यात आली.
या शिबिरासाठी Dr. P. C. Gothi Multispeciality Hospital येथील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम विशेष उपस्थित होती. डॉ. मुकेश गोठी यांच्या मार्गदर्शनाखालील वैद्यकीय पथकाने रुग्णांची सविस्तर तपासणी करून योग्य वैद्यकीय सल्ला दिला. वेळेवर तपासणी व उपचार घेतल्यास गंभीर आजारांपासून बचाव करता येतो, असा संदेश डॉक्टरांनी दिला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास MIDC Police Station चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पेंदोरे प्रमुख उपस्थित होते. तसेच शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे, कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे व दसरखेडचे पोलीस पाटील नारायण साठे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बोदडे, राजेश लांडे, गजानन धाडे, आदेश शिंदे, भागवत पाटील, रमेश वाघे, संदेश शिंदे, सागर नरवाडे, धनराज पाटील, प्रदीप नरवाडे, तानाजी पाटील, सचिन पाटील, सागर पवार, रोहन बाळापूरे आदींनी सहकार्य केले.
सदर शिबिराचे आयोजन शिवसेना तालुका प्रमुख तथा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती दसरखेडचे अध्यक्ष विजय साठे यांच्या पुढाकारातून करण्यात आले
दसरखेड येथे शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
0
9
4
8
3
8
Users Today : 10
Leave a comment