लोणार प्रतिनिधी :
लोणार नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्याम पूजाजी राऊत यांची लोणार तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती Mallikarjun Kharge, Sonia Gandhi यांच्या मान्यतेने तसेच काँग्रेस कमिटीचे महासचिव Mukul Wasnik यांच्या संमतीने करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांच्या आदेशाने व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार Rahul Bondre यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली.
१७ फेब्रुवारी रोजी लोणार येथील कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण घुमरे यांच्या हस्ते राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष आश्रु फुके, भूषण मापारी, शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद, आरोग्य सभापती अब्दुल उबेद हाजी अब्दुल मुनाफ, संतोष मापारी, दौलत मानकर, बंडू सांगळे, प्रा. भानुसे, भवानी मापारी आदी उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मण घुमरे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढविण्याचे आवाहन केले. श्याम राऊत यांनी आपल्या भाषणात वरिष्ठ नेतृत्वाने दिलेला विश्वास सार्थ ठरवत पक्ष बळकटीकरणासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले
काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी श्याम राऊत
0
9
4
8
3
8
Users Today : 10
Leave a comment