नांदुरा प्रतिनिधी :
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर वडनेर भोलजी पंचमुखी हनुमान मंदिराच्या सभा मंडपात एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.४५ वाजेपूर्वी उघडकीस आली.
घटनेचा तपशील:
मृतकाची ओळख गजानन माधवराव ताडे (वय ५०) रा. पंचवटी नगर, मलकापूर अशी झाली.
त्यांचा भाऊ विष्णू माधवराव ताडे यांनी १५ फेब्रुवारी रोजी मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये गजानन ताडे बाबत मिसिंग रिपोर्ट दाखल केला होता.
१९ फेब्रुवारी रोजी गजानन ताडे मंदिराच्या सभा मंडपात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन मृतावस्थेत आढळले.
पोलीसांनी आकस्मिक मृत्यू नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
Users Today : 10