इच्छापूर्ती महादेव मंदिरात महिलांकडून अखंड भजन

KHOZ MASTER
1 Min Read

खामगाव प्रतिनिधी :
बोरी अडगाव ते पळशी बु. रोडवरील इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
महाशिवरात्रीच्या पवित्र रात्री महिलांनी एकत्र येत अखंड भजन-कीर्तन केले. संपूर्ण मंदिर परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला. भगवान शंकराच्या स्तुतीपर अभंग, ओव्या व पारंपरिक भजने सादर करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या भजन कार्यक्रमात परिसरातील तसेच जवळील गावांमधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शिवलिंगावर बेलपत्र, दूध व पाणी अर्पण करून पूजा-अर्चा करण्यात आली. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी भक्तांनी प्रार्थना केली.
उत्सवानिमित्त सकाळी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. उपवास करणाऱ्यांसाठी साबुदाणा खिचडी, शेंगदाणे व प्रसाद देण्यात आला. मंदिर समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या वेळी लता बोहरपी, अरुणा बोहरपी, गौकर्णा बोहरपी, राधा बोहरपी, कलावती बोहरपी, वर्षा बोहरपी, रुक्मिणी बोहरपी, ज्ञानेश्वरी बोहरपी, शंकुतला बोहरपी, निर्गुणाबाई काळे, सत्यभामा उमाळे, जया किर्तने, चंद्रकला ठाकरे, अनिता बोहरपी, कोकिळा दुतोंडे, विमलबाई परकाळे, वंदना बोहरपी, जिजा देऊळकार, सुनंदा काळे, नंदा दुतोंडे, विमल ठाकरे, निकिता बोहरपी, नेहा बोहरपी, प्रगती बोहरपी, दिपाली बोहरपी, वैष्णवी बोहरपी आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *