बुलढाणा प्रतिनिधी :
एडेड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील स्व. या. मा. काळे सभागृहात Buldhana Education Society, बुलढाणा मार्फत स्व. बाळासाहेब कविमंडन स्मृतीप्रीत्यर्थ जिल्ह्यातील सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी जिल्हा पोलिस अधीक्षक Nilesh Tambe यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रामप्रसाद यादव, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. तुषार महाजन, विशेष अतिथी मिनलताई कविमंडन, संस्थेचे सचिव अॅड. रामानंद कविमंडन, संचालक अॅड. आनंद चेकेटकर, तो. सी. उबरहंडे, संस्थेचे सदस्य अॅड. राघव कविमंडन तसेच मुख्याध्यापक किंबहुने आदी मान्यवर उपस्थित होते.
सात फेऱ्यांमध्ये रंगली स्पर्धा
स्पर्धेच्या एकूण सात फेऱ्या पार पडल्या. निकाल पुढीलप्रमाणे —
शिक्षक प्रवर्ग :
प्रथम – दीपक खडसन
द्वितीय – रघुनंदन देशपांडे
तृतीय – विष्णू राजगुरू
महिला शिक्षिका प्रवर्ग :
प्रथम – शुभांगी देशमुख
द्वितीय – जयश्री मानतकर
शिक्षकेतर प्रवर्ग :
प्रथम – किरण पाटील
द्वितीय – विश्वजीत लव्हाळे
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
जिल्हास्तरीय शिक्षक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन – बुलढाणा
0
9
4
8
3
8
Users Today : 10
Leave a comment