सिंदखेड राजा : नवनगराचे काम सुरू; संवादकांना बसवले घरी

KHOZ MASTER
1 Min Read

सिंदखेड राजा प्रतिनिधी :
Hinduhridaysamrat Balasaheb Thackeray Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg साठी जमीन संपादन प्रक्रियेत शासन व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील संवादकांनी पायाभरणीपासून प्रकल्प पूर्णत्वापर्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक ठिकाणी समन्वय साधला गेला आणि कामाला गती मिळाली.
समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या संवादकांना कृषी समृद्धी नवनगर, माळसावरगाव येथे कार्यरत करण्यात आले होते. येथेही त्यांनी गेल्या पाच वर्षांत प्रामाणिकपणे काम केल्याचा दावा केला आहे. मात्र, जुलै २०२५ पासून शासनाने संवादकांची सेवा बंद केल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
Maharashtra State Road Development Corporation (एमएसआरडीसी) यांनी संवादकांच्या योगदानाचा विचार न करता त्यांना कामावरून कमी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अधिकृतरीत्या सेवा बंद असतानाही संवादकांकडून समन्वयाची कामे करून घेतली जात असून त्यांना कोणताही मोबदला दिला जात नसल्याचा आरोप आहे.
संवादक, शेतकरी आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यात अनेक वर्षे समन्वयाचे नाते राहिले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आजही त्यांना मध्यस्थी करावी लागत असल्याचे सांगितले जाते. आपल्या मागण्यांसाठी संवादकांनी विविध राजकीय, सामाजिक मान्यवर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदने दिली, दूरध्वनीद्वारे संपर्क साधला; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
येत्या आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास उपोषण आंदोलन करण्याचा इशारा संवादकांनी दिला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *