घरासमोरून दुचाकी चोरीची घटना

KHOZ MASTER
1 Min Read

सुलतानपूर प्रतिनिधी :
येथील पत्रकार मोईन खान मन्नान खान यांची घरासमोरील एमएच २८-एव्ही ९२८४ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली. ही घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली.
मोईन खान नेहमीप्रमाणे सायंकाळी गाडी घरासमोर हँडल लॉक करून उभी केली होती. सकाळी पहाटे जेव्हा त्यांनी मोटरसायकल पाहिली, तेव्हा ती गायब होती. आसपास विचारपूस करूनही गाडी सापडली नाही.
याबाबत मेहकर पोलिसांनी तक्रार नोंदवून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस राजेश जाधव करत आहेत.

0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *