बुलढाण्यात मक्याचे खरेदी उद्दिष्ट कमी; शेतकऱ्यांकडे तांत्रिक अडचणी

KHOZ MASTER
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी :

जिल्ह्यात मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असतानाही नाफेडकडून खरेदीसाठी दिलेले उद्दिष्ट अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक खरेदी केंद्रे बंद ठेवण्यात आल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न थांबले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे:
बुलढाणा जिल्ह्यात ५२,८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड झाली.
नाफेडच्या निकषानुसार अंदाजे २०,६१,३७२ क्विंटल उत्पादन अपेक्षित होते.
प्रत्यक्षात फक्त ६०,००० क्विंटल खरेदीसाठी उद्दिष्ट दिले गेले, जे उत्पादनाच्या तुलनेत नगण्य आहे.
सुमारे ५,७०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असूनही, “उद्दिष्ट पूर्ण” असल्याचा आधार देऊन खरेदी केंद्रे बंद केली गेली आहेत.
यामुळे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात मका शिल्लक राहिला असून, काही खासगी व्यापाऱ्यांचा गैरफायदा घेत बाजारभाव पाडला जात आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे आणि सरकारविरोधात रोष निर्माण झाला आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके यांनी पन्ना मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून खरेदी उद्दिष्ट वाढवून सर्व केंद्रे तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा मका हमीभावाने खरेदी केला जावा आणि शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.

0 9 4 8 3 8
Users Today : 10
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *