खामगाव प्रतिनिधी :
तिघांविरुद्ध गुन्हा; दीड लाखात जमीन बळकावण्याचा प्रयत्नखामगाव : दीड लाख रुपये व्याजाने घेऊन शेतजमीन गहाण ठेवली. रक्कम परत करूनही सावकारांनी वीस लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करत मानसिक छळ केल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरानजीक वाडी येथे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली.
मृत शेतकऱ्याचे नाव भास्कर लक्ष्मण तायडे (वय ५५) असे असून ते वाडी येथील भीमनगर परिसरातील रहिवासी होते.
कर्ज व्यवहार आणि वाद
भास्कर तायडे यांनी
सोमेश्वर नामदेव दामोदर (वय ६१, रा. भीमनगर वाडी)
प्रवीण संतोषराव खारोडे उर्फ निखिल देशमुख (वय ३७, रा. वाडी)
विजय त्र्यंबक इंगळे (वय ४५, रा. संत गजानन अपार्टमेंट, आदर्श नगर, खामगाव)
यांच्याकडून १ लाख ४९ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात शेतजमीन गहाण ठेवण्यात आली होती.
शेतकऱ्याने मूळ रक्कम परत केल्यानंतरही जमीन पुन्हा नावावर करून देण्याऐवजी आरोपींनी वीस लाख रुपयांची मागणी केली. वारंवार मानसिक छळ व दबाव टाकल्याने तायडे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. चिट्ठीत आरोपींचा उल्लेख
सावकारांच्या जाचाला वैतागून भास्कर तायडे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आरोपींच्या नावाने चिठ्ठी लिहून त्रासाचा उल्लेख केल्याची माहिती आहे.
गुन्हा दाखल
या प्रकरणी फिर्यादी गजानन तुळशीराम वाघोदे (रा. तायडे कॉलनी, खामगाव) यांच्या तक्रारीवरून Khamgaon City Police Station येथे तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(२)(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत.
Users Today : 5