मोताळा प्रतिनिधी :
राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्या वतीने १८ फेब्रुवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरात २७ तरुणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
हे शिबिर शिवसेना (उबाठा) जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
१००० पिशव्यांचा संकल्प पूर्ण
या रक्तदान महायज्ञातून १००० पिशव्या रक्त संकलनाचा संकल्प पूर्ण झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. सामाजिक बांधिलकी जपत तरुणांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी श्रीराम बोदडे, डॉ. शरद काळे, मनोहर पाटील, सुरेश सरोदे, गणेश पाटील, अमोल देशमुख, प्रविण जवरे गुरुजी, प्रशांत पाटील, राहूल अढाव, तुळशीराम मापारी, ज्ञानेश्वर खंडागळे, सरपंच महादेव शिराळ, बाळकृष्ण उदयकार, कैलास झंवर, विजय इंगळे, शिवशंकर राऊत, गजानन मामलकर, रंजीत बोराळे, दिपक शेळके, चंद्रकांत पाटील, योगेश महाजन, विनोद ढोण, इनायन खान, गजानन जंगले, जावेद खान, मिलिंद अहिरे, किरण पाखरे आदी उपस्थित होते.
रक्तदात्यांचा सहभाग
अक्षय बढे, देवांश पाटील, योगेश चव्हाण, योगेश तायडे, गणेश देशमुख, निलेश भोंडेकार, आदेश चोपडे, पवन कुकडे, राजेंद्र मानकर, अक्षय वखरे, रविराज सुरडकर, निखील शिंबरे, प्रफुल्ल राजपूत, निलेश माटे, अक्षय चहाकर, चेतन शर्मा, अनंता संबारे, मनोज दिवाणे, विनोद ढोण, कुणाल वराडे, अमोल बागवान, सुशांत सुपे, अभिजीत शिरपुरकर, अजय वराडे, प्रतिक पाटील, श्रीकृष्ण वाघ, सुमीत बढे यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.
Users Today : 5