वाशीम प्रतिनिधी :
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मॉडेल करिअर सेंटर), वाशीम तसेच सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा मालेगाव रोडवरील सावरगाव बर्डे येथे पार पडणार आहे.
नामांकित कंपन्यांची उपस्थिती
मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांकडून प्रत्यक्ष (ऑन-द-स्पॉट) मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना त्वरित नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मेळाव्यात काय मिळणार?
ऑन-द-स्पॉट मुलाखती
रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची माहिती
स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन
विविध महामंडळांच्या कर्ज योजनांची माहिती
यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या रोजगार मेळाव्यांमधून शेकडो युवक-युवतींना रोजगार मिळाला असून अनेकांनी स्वतःचा उद्योगही सुरू केल्याचे सकारात्मक चित्र आहे.
अधिकाऱ्यांचे आवाहन
सहा आयुक्त प्रवीण खंडारे यांनी जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवती, आयटीआय, पदवीधर, तांत्रिक शिक्षण घेतलेले उमेदवार तसेच स्वयंरोजगार इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
राज्य शासनाच्या कौशल्य विकास उपक्रमांमुळे युवकांना स्थिर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून हा मेळावा रोजगाराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
Users Today : 5