वाशीम प्रतिनिधी :
शहरात आयोजित राज्यस्तरीय डॉक्टर्स बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. रुग्णसेवेची जबाबदारी सांभाळताना डॉक्टरांनी क्रीडाक्षेत्रातही आपली ऊर्जा, तंदुरुस्ती आणि स्पर्धात्मकता सिद्ध केली.
या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, पुसद, हिंगोली, अमरावती, मेहकर, अकोला तसेच इतर विविध जिल्ह्यांमधून डॉक्टर खेळाडू मोठ्या संख्येने वाशीम येथे दाखल झाले होते.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास खासदार संजय देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत व्यावसायिक जीवनात समतोल राखण्यासाठी क्रीडा किती आवश्यक आहे, यावर भर दिला.
स्पर्धेस माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले यांचे प्रमुख प्रायोजकत्व लाभले. तसेच डॉ. संतोष सारडा, डॉ. लांडकर, डॉ. कानडे, डॉ. देवळे तसेच नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या.
यशस्वी आयोजन
राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन डॉ. किशोर कावरखे, डॉ. आशिष बेदरकर, डॉ. राहुल इढोले, डॉ. श्वेता मोरवाल, डॉ. बालाजी हरण, डॉ. रोशन व्यास, डॉ. दिपाली बेदरकर, डॉ. विशाल वनसागर, डॉ. पराग देशमुख, डॉ. प्रकाश भागडे आणि डॉ. मोनिका भागडे यांच्या संयुक्त व अथक प्रयत्नांतून करण्यात आले.
ही स्पर्धा डॉक्टरांमधील क्रीडाप्रेम आणि एकात्मता वृद्धिंगत करणारी ठरली असून व्यावसायिक ताणतणाव कमी करण्यासाठी क्रीडा उपक्रम किती महत्त्वाचे आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले*
Users Today : 5