खेट्री प्रतिनिधी :
पातूर तालुक्यातील सावरगाव परिसरातील गाळलेल्या विहिरींच्या सर्वेक्षणात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अॅक्शन मोड घेतला आहे. या प्रकरणी २४ फेब्रुवारी रोजी सावरगाव येथे सुनावणी होणार आहे.
जिल्हा परिषदेकडून निर्देश
१७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेने पातूर येथील गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तात्काळ चौकशीचे निर्देश दिले आहेत.
सावरगाव परिसरातील गाळलेल्या विहिरींच्या सर्वेक्षणात सचिव समाधान साळोकार आणि कृषी सहाय्यक अरुण ताले यांनी अनियमितता केल्याची तक्रार करण्यात आली होती.
आत्मदहनाचा इशारा
महादेव पायगन यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा देत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने भूमिका घेत मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
२४ फेब्रुवारीला सुनावणी
या प्रकरणाची सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी सावरगाव येथे होणार असून संबंधित अधिकारी व तक्रारदार यांची बाजू ऐकून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
या सुनावणीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Users Today : 5