देऊळगाव राजा : विद्यार्थिनींना शालेय गणवेश वाटप

KHOZ MASTER
1 Min Read

देऊळगाव राजा प्रतिनिधी :

Giants Welfare Foundation द्वारा संचलित जायंटस सहेली ग्रुप, देऊळगाव राजा यांच्या वतीने शहरातील गरजू विद्यार्थिनींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
नव्याने स्थापन झालेल्या सहेली ग्रुपने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, समाजाप्रती कृतज्ञतेची भावना जपत हा उपक्रम हाती घेण्यात आला. आर्थिकदृष्ट्या हलाखीची परिस्थिती असलेल्या विद्यार्थिनींना शिक्षणात अडथळा येऊ नये, या उद्देशाने गणवेश वितरण करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास
जायंटस ग्रुपचे अध्यक्ष किशोर अंबुस्कार
सहेली ग्रुपच्या अध्यक्षा किरण अंबुस्कर
सचिव लता हरकुट
मालती कायंदे
राखी काबरा
आदी उपस्थित होत्या.

0 9 3 2 7 4
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *