अकोला प्रतिनिधी :
The Institute of Chartered Accountants of India (ICAI) च्या Western India Regional Council अंतर्गत अकोला शाखेची २०२६–२७ साठी नवीन कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. हा निर्णय १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
पदाधिकारी
अध्यक्ष: सीए रोमिल सोजातिया
उपाध्यक्ष: सीए प्रतीक मंत्री
सचिव: सीए विशाल राजपाल
कोषाध्यक्ष: सीए श्याम माहेश्वरी
‘विकासा’ अध्यक्ष: सीए धीरज चांडक
कार्यकारी सदस्य: सीए मनोज चांडक
तरुण नेतृत्वाची नोंद
सीए रोमिल सोजातिया हे अवघ्या ३२ व्या वर्षी अकोला शाखेचे अध्यक्ष झाले असून, शाखेच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे. ही शाखेसाठी महत्त्वाची उपलब्धी मानली जात आहे.
मावळते अध्यक्ष सीए धीरज चांडक यांनी यशस्वी कार्यकाळानंतर अध्यक्षपदाची सूत्रे सीए रोमिल सोजातिया यांच्याकडे सुपूर्द करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
नवीन टीमकडून अकोला शाखेच्या उपक्रमांना अधिक गती देत व्यावसायिक विकास, प्रशिक्षण व सदस्य हिताच्या कार्यक्रमांना नवी उंची मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. **
Users Today : 7