शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

KHOZ MASTER
1 Min Read

मानोरा प्रतिनिधी :

स्थानिक मा. सु. पा. कला, विज्ञान व कै. पां. ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुकास्तरीय ऑनलाईन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा व प्रेरणादायी व्याख्यानमाला उत्साहात पार पडली.
११३४ विद्यार्थ्यांचा भव्य सहभाग
सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत
अ गटातून : ६८५ विद्यार्थी
खुल्या गटातून : ४४९ विद्यार्थी
अशा एकूण ११३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग ही अभिमानास्पद बाब ठरली. विद्यार्थ्यांनी शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्तीचे दर्शन घडविले.
प्रेरणादायी व्याख्यानमाला
व्याख्यानमालेत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांनी शिवरायांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजन, अचूक रणनीती आणि लोकाभिमुख प्रशासनाची प्रभावी मांडणी केली.
यशस्वी नेतृत्वासाठी दूरदृष्टी, शिस्त आणि ध्येयाप्रती निष्ठा आवश्यक असते, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज, असे त्यांनी सांगितले.
डॉ. स्नेहा टोम्पे यांनी “शिवचरित्रातून काय शिकावे” या विषयावर मार्गदर्शन करताना शिवरायांचे सुयोग्य प्रशासन, सर्वधर्मसमभाव, न्यायप्रियता व व्यवस्थापन कौशल्य यांचा सखोल उहापोह केला. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
आयोजन
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. ए. वाय. अली यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल ढवळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. पंकज गावंडे यांनी केले.
प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा व विशेष व्याख्यानाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

0 9 3 2 7 4
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *