मेहकर येथे शिवजयंती उत्सवात उत्स्फूर्त सहभाग

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी :
“निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू |
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ||”
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, लोककल्याणकारी रयतेचे राजे महाराजाधिराज
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त मेहकर शहरातील लोणार वेस येथे आयोजित सोहळ्यास उपस्थित राहून महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, आरती व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी शिवप्रेमींसमवेत महाराजांच्या आदर्श कार्यांचे स्मरण करत स्वराज्याच्या विचारांना दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. समस्त नागरिकांना शिवजयंती उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रमास मा. आ. संजयजी रायमुलकर,
युवासेना जिल्हाप्रमुख श्री. ऋषी जाधव,
शिवसेना तालुका प्रमुख श्री. सुरेश वाळुकर,
युवासेना उपजिल्हा प्रमुख श्री. भूषण घोडे
तसेच शिवसेना-युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, युवकबांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 3 2 7 4
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *