बुलढाणा प्रतिनिधी
शहरात आयोजित करण्यात आलेल्या बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग २०२६ या ॲग्रो स्टेट लेव्हल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. कृषी क्षेत्राशी संबंधित विविध कंपन्या व प्रतिनिधींच्या सहभागामुळे ही राज्यस्तरीय स्पर्धा विशेष ठरत आहे.
क्रीडा आणि कृषी क्षेत्रातील सुसंवाद अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून संघभावना, शिस्त आणि क्रीडाभावना यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देत स्पर्धा उत्कट व प्रेरणादायी वातावरणात पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
उपस्थित मान्यवर
कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, प्रकाश पडोळ, रूपराव उबाळे, विधानसभा समन्वयक गणेशसिंग राजपूत, सुनील देशमुख, गजानन नाईकवाडे, विशाल बावस्कर, अनिल कोचर, पंकज भंडारी, अनिलशेट सिसोदिया, राजूभाऊ सावळे, सचिन राजपूत, शिवम पडोळ, प्रज्वल धुळधर आदी मान्यवरांसह राज्यातील ॲग्रो कंपनी क्षेत्रातील विविध खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या निमित्ताने शहरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून विविध संघांमध्ये चुरशीच्या लढती रंगणार आहेत. बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग २०२६ ही स्पर्धा कृषी क्षेत्रातील बांधिलकी आणि क्रीडाप्रेम यांचा सुंदर संगम ठरणार आहे.
Users Today : 7