बुलढाणा प्रतिनिधी :
हिंदवी स्वराज्य संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, बुलढाणा येथे भव्य शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीत
जिजाबाई (राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब) व बालशिवबा यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण संपन्न झाले.
केंद्रीय आयुष मंत्री
प्रतापराव जाधव
यांच्या तसेच मान्यवरांच्या हस्ते शिल्पाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी जिजाऊ व बालशिवबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गुलाबराव खरात,
शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, महिला आघाडी जिल्हा समन्वयक अनुजाताई सावळे, जालिंदर बुधवत, रणजीत राजपूत, तेजराव नरवाडे, दिलीप जाधव तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थिनींचे आकर्षक सादरीकरण
जिल्हा परिषद बोराखेडी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
शिवस्मारकाला भेट
कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या समवेत संगम चौक येथील शिवस्मारकाला भेट देऊन छत्रपती शिवरायांचे दर्शन घेण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रभक्ती, संस्कार व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. शिवजयंतीनिमित्त जिल्हा परिषद परिसर शिवमय झाला असून उपस्थितांनी शिवराय व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या आदर्शांचा जागर करण्याचा संकल्प व्यक्त केला
Users Today : 7