जयंती आपल्या महाराजांची – चिखलीत धूम बाईक रॅली

KHOZ MASTER
1 Min Read

चिखली प्रतिनिधी :

महाराष्ट्र व अखंड हिंदुस्तानचे भूषण
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त चिखली शहरात भव्य महिला बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती चिखली शहर तर्फे आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येने चिखलीकर माता-भगिनी उत्साहाने सहभागी झाल्या. भगव्या पताकांनी सजलेल्या दुचाकींसह शहरातून जल्लोषात रॅली काढण्यात आली.
रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सादर वंदन करण्यात आले. घोषणाबाजी आणि शिवगर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
महिला शक्तीच्या सहभागामुळे शिवजयंती उत्सवाला विशेष उत्साह प्राप्त झाला असून, स्वराज्याच्या विचारांची जागर सर्वत्र करण्यात आली.

0 9 3 2 7 4
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *