पाणीपुरी खाण्यासाठी गेली अन् बेपत्ता झाली शेगावच्या मोदीनगर परिसरातील घटना; शहरात खळबळ

KHOZ MASTER
1 Min Read

शेगाव प्रतिनिधी :
पाणीपुरी खाण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली २४ वर्षीय विवाहिता परत न आल्याची घटना संतनगरी शेगाव शहरातील मोदीनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून शेगाव शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
मोदीनगर येथे राहणारे प्रविण रामदास निंबाळकर (वय ३३) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी भारती प्रविण निंबाळकर (वय २४) घरीच होती.
काही वेळानंतर भारती हिने घरातील सासऱ्यांना “मुरारका चौकातून पाणीपुरी खाऊन येते, तोपर्यंत मुलगा अमरला सांभाळा,” असे सांगून घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ उलटूनही ती परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत काहीही माहिती न मिळाल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
याप्रकरणी प्रविण निंबाळकर यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी शेगाव शहर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी मिसिंग दाखल करून तपास सुरू केला आहे.
बेपत्ता भारतीची उंची सुमारे ५ फूट, रंग सावळा, केस लांब व क्रीम रंगाचे आहेत. अंगात जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, निळ्या रंगाची ओढणी, निळी लेगीज आणि पायात कथ्या रंगाचे सँडल घातलेले होते.
या वर्णनाची महिला दिसून आल्यास किंवा तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शेगाव शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी पोलीस अंमलदार निलेश गाडगे यांनी केले आहे.

0 9 4 8 3 3
Users Today : 5
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *